prabodhini news logo
Home ठळक बातम्या स्त्री शक्ती मंच संघटनेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले जयंती साजरी

स्त्री शक्ती मंच संघटनेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
82

वाशिम प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सावित्रीबाई फुले जयंती स्त्री शक्ती मंच संघटनेच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.
सघटनेचया अध्यक्षा शारदा अतुल भुयार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शारदा भुयार याणी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर स्वतः लिहिलेली कविता सादर केली.

सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला वंदन करून सर्वांनी सर्व सावित्रीच्या लेकी सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे नेऊ आम्ही थांबणार नाही आणि सामाजिक कार्य सतत करु. आम्ही थांबणार नाही हा संकल्प केला आणि सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर राहून सामाजिक कार्य करू असं संकल्प घेतला योगिता नेमाडे, सोनु बंदिवान, शारदा भुयार, अंजली काटकर कामक्षा सोने, सरीता हिंगे,रेचल वानखेडे, वैशाली परिमल, मंगला सर्वांच्या उपस्थित तर प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हार घालून वंदन करण्यात आले.महिलानी आपले विचार व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या मुळे स्वच्छंदी जीवन जगत आहोत.हा सुखद अनुभव आहे हे म्हटले. योगिता नेमाडे यांनी मोबाईल मुळे अधोगती होत आहे असे म्हटले. तर कामक्षा सोने यांनी म्हटले परत एकदा सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव आवश्यक आहे.
हिंगे म्हणाल्या आजचं वातावरण भयावह असुन महिला सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला विसरत आहेत. परत एकदा सावित्रीबाई यांनी यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here