
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – आज दिनांक 12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इयत्ता सहावीचा विद्यार्थी ओंकार गोविंदराव देशमुख याने आपल्या बुलंद आवाज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्यावर भाषणाने उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले कुमारी आरोही रविकिरण वाघमारे हिने मी भोसल्यांची सून जाधव यांचे लेख बोलते उत्तम वेशभूषेसह जिजाऊंचे विचार घेऊन आले अशा शब्दात भाषणाची सुरुवात करून सर्वांसमोर शिवबांवरील संस्कार मांडले इयत्ता पाचवीचा विद्यार्थी जियान याने युवा दिन स्वामी विवेकानंदांचे विचार सर्वांसमोर मांडले प्रशिक डोंगरे युवराज सोनवणे रत्नेश्वरी गायकवाड रिया भिसे राजकुमार जाधव ज्ञानेश्वर गायकवाड कन्हैया सादुलवार इत्यादी विद्यार्थ्यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडले उत्कृष्ट सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी अमृता सिंगारे हिने केले भारती पुणे चे तालुका समन्वयक श्री गुरुनाथ गाडेकर व मिलिंद आळणे यांनी जिजाऊंचे विचार व स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान युवकांसाठी प्रेरणादायी आहे आज समाजास या धर्मनिरपेक्ष सर्वधर्मसमभाव स्त्री पुरुष समानता या जीवन मूल्यांची आवश्यकता आहे असे म्हटले कार्यक्रमाचे सुसंगत नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सुषमा पवार मॅडम यांनी केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक के एम चौखंडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण कुमार बोक्से प्रमुख पाहुणे गुरुनाथ गाडेकर मिलिंद आळणे वसमत तालुका बार्टी पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वी ततेसाठी चव्हाण, स्वामी, कदम अली, शुभम दुमाने, ढोरे, पूजा पोले यांनी प्रयत्न केले. सुषमा पवार यांनी आभार प्रदर्शन केले.















