prabodhini news logo
Home चंद्रपूर दहा वर्ष सत्तेत असतानाही स्थानिकांना पट्टे का दिले नाहीत…

दहा वर्ष सत्तेत असतानाही स्थानिकांना पट्टे का दिले नाहीत…

0
65

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – आज चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग १६ (हिंदुस्थान लालपेठ) येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार करिश्मा जंगम, अनिता चौखे व चंदा वैरागडे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभेला संबोधित केले.

राज्यात व केंद्रात गेल्या दहा वर्षांपासून सत्ता असूनही स्थानिक नागरिकांना घरांचे पट्टे का देण्यात आले नाहीत हे आधी भाजपने सांगावे. निवडणुका आल्या की ‘घरकुल’, ‘पट्टे’, ‘हक्क’ अशी आश्वासने भाजपकडून दिली जातात. पण गेली दहा वर्षे सत्ता असूनही गरीब, श्रमिक, झोपडपट्टीतील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे का मिळाले नाहीत? हा खरा प्रश्न आहे.

शहरातील अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या एकाच ठिकाणी राहत आहेत. कर भरतात, मतदान करतात, मात्र तरीही त्यांना कायदेशीर हक्क नाकारले जात आहेत. “पट्टे दिले नाहीत कारण सत्ताधाऱ्यांना गरीब कायम असाच ठेवायचा आहे. देशात प्रचंड महागाई व बेरोजगारी वाढली असून याचा आर्थिक फटका देशातील जनतेला बसत आहे. निवडणुकीत मत मागायची आणि नंतर विसरायचं, हीच त्यांची भूमिका आहे.

महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, चुकीचे नियोजन आणि जनतेच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष यामुळेच आजही हजारो कुटुंबे असुरक्षित अवस्थेत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर प्रत्येक पात्र नागरिकाला घराचा व जमिनीचा हक्क मिळवून देण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली

यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर प्रमोद बोरीकर, अनिल शिंदे यांचेसह स्थानिक काँग्रेस नेते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here