prabodhini news logo
Home चंद्रपूर अमृत योजने अंतर्गत भाजपचा ‘हर घर नल’चा नारा… मग नळातलं पाणी गेलं...

अमृत योजने अंतर्गत भाजपचा ‘हर घर नल’चा नारा… मग नळातलं पाणी गेलं कुठे…

0
59

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – आज चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ (जटपुरा) येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रमिज शेख, अश्विनी खोब्रागडे, मनोज वासेकर, मीनाक्षी गुजरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेला संबोधित केले.

केंद्र व राज्य सरकारने मोठा गाजावाजा केलेल्या अमृत योजनेअंतर्गत ‘हर घर नल’ चा नारा देत या भाजपने नागरिकांना स्वप्न दाखवली. मात्र प्रत्यक्षात चंद्रपूर महानगरातील अनेक वसाहतींमध्ये नळाला पाणी नाही, मग अमृत योजनेचे पाणी गेले कुठे असा सवाल चंद्रपूरकर विचारत आहे.

भाजप सत्ताकाळात पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रभागांमध्ये पाईपलाईन टाकून रस्ते खोदले, मात्र काम अर्धवट ठेवण्यात आले. परिणामी नागरिकांना पाणी नाही आणि रस्त्यांवर खड्डे अशी दुहेरी शिक्षा सहन करावी लागत आहे. भाजपचा कारभार म्हणजे घोषणा मोठ्या, काम शून्य. अमृत योजनेच्या नावाखाली महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, भाजपने देशाला व राज्याला कर्जबाजारी केले असून येथे महागाई व बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. केवळ धर्म, जात, भारत – पाकिस्तानच्या नावावर तेढ निर्माण करून अजून पाप करण्याचे काम भाजप परत आहे. अशा मनुवाद्यांना सत्तेतून खाली खेचून काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केले.

या आयोजीत सभेस शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, ज्येष्ठ काँग्रेस नेते विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, प्रमोद बोरीकर, अनिल शिंदे, शंतनु धोटे, कुणाल चहारे यांचेसह स्थानिक काँग्रेस नेते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here