
उज्वला नगराळे महिला जिल्हा संपादिका प्रबोधिनी न्युज – घुग्घुस शहरातील लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या पॉवर प्लांटमधून सुरू असलेला अत्यंत भयंकर आवाज तसेच कंपनीकडून होत असलेले अति प्प्रदूषण मुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीच्या १००मीटर आतच गावातील सरकारी दवाखाना आहे तिथे गर्भवती महिला येतात तसेच अन्य पेशंट ला याचा त्रास सहन करावा लागत आहे या मुळे नवीन जमलेल्या बाळाच्या जीवाला हानी होण्याची शक्यता सुद्धा वाढतो.
कंपनीच्या ध्वनी आणि वायू प्रदूषण मुळे शहरातील आजाराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे याची दक्षता घ्यावी आणि येणाऱ्या ०७ दिवसात हा प्रदूषण बंद नाही झाल्यास कंपनी विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना (उ.बा.ठा) तर्फे प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर इथे माहीत सदर करून चेतावणी देण्यात आली आहे.
या वेळी शहर अध्यक्ष हेमराज बावणे, शहर संघटक अमित बोरकर,योगेश भानदककर, गणेश उईके सह अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.















