prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाती

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाती

0
75

येथे जन्म घेणे अनाकलनीय
या जगाचा फापट पसारा
कधी कधी होतात अनोळखी नाती
जगण्याच्या वाटेतील एक सहारा…

कधी सुख कधी दुःख
ऊन सावली सारखे
सुंदर मनांची ओवावी माळ
विचार विशाल पर्वता सारखे…

नजरेत असावा शुद्ध भाव
का करावे कावेडाव
प्रश्न मग उभा राहतो
कशी चालेल जगण्याची नाव..

मी माझा एकटा
का नसावे निर्मळ पाण्यासारखा
तुमच्याशी नाते जोडताना
कसे राहू परका…

हे एक अनोळखी नाते
नसतील जन्माच्या गाठी
हे जीवन जगण्याच्या शर्यतीत
समर्पित राहतील प्रेमासाठी…..

गायकवाड मनोज रामचंद्र.
शहापूर जिल्हा ठाणे ©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here