
अनोळखी नाते दोन
लोकांमधील संबंध l
ओळख काढण्यासाठी
कोणतेही नसतात निर्बंध l
असे नाते वैयक्तिकरित्या
एकमेकांना न ओळखणारे l
ज्यांना भावनिक सामाजिक
वैयक्तिक बंधन नसणारे l
अनोळखी नात्यांना नाही
कोणताही सामायिक इतिहास l
ओळख तर नसतेच नसतो
कोणताही वैयक्तिक विश्वास l
जरी संवाद असला तरी
संक्षिप्त आणि औपचारिक l
ग्राहक आणि दुकानदार
बस मध्ये बसलेले शेजारी लोक l
सामाजिक मानसिक भाषेत
असतो संवाद मर्यादित l
भावनिक सहभाग कमी
सभ्य लोक दूर जातात l
ऑनलाईन डिजिटल संदर्भात
अनोळखी नाते अस्तित्वात l
दोघे ऑफलाईन नाही पण
ऑनलाईन संवाद साधतात l
अनोळखी नात्यात विश्वास
भावनिक संबंध अभावाद्वारे l
कालांतराने ओळखीने संवाद
विकसित होऊ शकतो मैत्रीद्वारे l
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















