
मकर संक्रांतीच्या आधी भोगी
माझा शेतकरी मग्न कापणीत
खुप उत्साहात पंतग उडवता
सुखी व्हायला शेती संसारात.
तसे या भोगीत आहे विज्ञान
गुळातला गोडवा ही भावना
व्हावी सुटकाच पापांपासून
धार्मिकता करुणाची याचना
पहाटेचे स्नान करतात सारे
थोडे तीळही टाकून पाण्यात
गरम उष्ण खाणे हिवाळ्यात
मिटतात भोग सारे हंगामात.
उकडहंडी भाज्यांपासून करी
थंडगार वातावरण वाटे छान
तीळातली भाकरी तुप लावी
ज्वारी बाजरीची उजळे शान.
जुने रुसवे विसरत पंतग उडवू
तीळगूळ वाटू गुजगोष्टी करु
सुहासिनीच्या साज शृंगारात
मनातले हेवेदावे सारे विसरु
सुरेंद्र यशवंत पाटील,ठाणे















