
तिळागुळाचा गोडवा
मकर संक्रांतीचा सण
स्नेहाचा जोडून भाव
आनंदाचे उधळून क्षण—!!
क्षल कपट द्वेष हेवे दावे
कटूता काढून हृदयातून
सुख दुःखाचे बनून साथी
गोड प्रेमाच्या वर्षावातून—!!
वाणी गोड व्हावी ओठांत
माया आपुलकी निर्माण
आनंद द्विगुणित असावा
सर्व आपलेच आपलेपण—!!
हर्ष हळद कुंकवाचा मान
उल्हास नारी शक्तीचा फार
एकजुटीने मिळून मिसळून
धैर्याने एकपणाचा स्वीकार —!!
हातात बळ मनात प्रेमभाव
तिळागुळाची उर्जा मिळेल
ओठांत उमटतील गोड बोल
वाणीत माधुर्य शब्दाचे कळेल —!!
सौ.सविता संजय भोयर राजुरा















