prabodhini news logo
Home चंद्रपूर ढिवर–भोई समाज महिला मेळाव्यातून एकतेचा संदेश

ढिवर–भोई समाज महिला मेळाव्यातून एकतेचा संदेश

0
158

महर्षी वाल्मिकी महिला बचत गटांच्या वतीने सामूहिक मकरसंक्रांत साजरी

ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. २१: ढिवर–भोई समाज महिला मंडळ, ब्रम्हपुरी यांच्या वतीने मंगळवार, दि. २१ जानेवारी रोजी शहरातील गणेश आरो सेंटर, कुर्झा, ब्रम्हपुरी येथे तिळसंक्रांतीनिमित्त स्नेहमिलन व सामूहिक मकरसंक्रांत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्यातून महिलांनी सामाजिक एकता, सौहार्द व सामाजिक बांधिलकीचा ठळक संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात निता वाघधरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमांना दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर हळदी–कुंकू कार्यक्रमात सुहासिनी वाणाचे वितरण करण्यात आले. तिळगुळ देत महिलांनी एकमेकांशी संवाद साधून आपुलकी व स्नेह व्यक्त केला.
मेळाव्यात नृत्य, उखाणे आदी सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी रंगत आणली. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापनासाठी रेखा कामडी, माधुरी दिघोरे, सविता चाचरकर,वंदना अलगदेवे, सविता चाचेरे, मिना वाघधरे,विना दिघोरे व प्रतिभा शिवुरकर आदी भगिनींनी पुढाकार घेतला. तसेच विशेष सहकार्य वैशाली चाचेरे, अनिता भानारकर,शितल सिंधीमेश्राम, मिनाक्षी मेश्राम, किरण बावणे, मयुरी शिवुरकर,ग्रीष्मा दिघोरे, अंजली शेंडे, मंजु कामडी, चांदेकर ताई,अलगदेवे ताई त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी ढिवर–भोई समाजातील कुटुंबीयांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. या स्नेहमिलनातून महिलांची एकजूट, सामाजिक बांधिलकी व संस्कृतीचे जतन यांचे दर्शन घडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here