
महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क.
mojissports@gmail.com
8104170564
मिरा-भाईंदर – मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात येत्या माघी श्रीगणेश विसर्जनासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणून महानगरपालिकेच्या वतीने ९ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था महानगरपालिका आयुक्त मा. राश्मीनंद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे.
माघी श्रीगणेश विसर्जन दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार POP (Plaster of Paris) मूर्तींचे विसर्जन फक्त कृत्रिम तलावातच करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील विविध भागात तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महापालिकेने मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींसाठी मिरा रोड (पश्चिम) व मिरा रोड (पूर्व) येथील ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तसेच हायड्रॉलिक क्रेनची सोय देखील करण्यात आली आहे.
कृत्रिम तलावांची ठिकाणे :
उत्तन समुद्रकिनारा
सुभाषचंद्र बोस मैदान – मिरा रोड (पश्चिम)
मिरा रोड (पश्चिम) जेटी
जेसल पार्क चौपाटी – मिरा रोड (पूर्व)
स्व. आनंद दिघे मैदान – मिरा रोड (पूर्व)
शिवर गार्डन – मिरा रोड (पूर्व)
घोडबंदर साठवणूक आगार
साई दर्शन तलाव – पेनकर पाडा
जरीमरी तलाव – काशीमीरा
प्रत्येक कृत्रिम तलावावर महापालिकेचे कर्मचारी तैनात असणार असून, नागरिकांना सुरक्षित व सुव्यवस्थित विसर्जनाची सुविधा मिळणार आहे.
महानगरपालिकेने सर्व नागरिकांना कृत्रिम तलावांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.















