prabodhini news logo
Home ठळक बातम्या ग्रामीण रुग्णालय अडयाळ येथे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम संपन्न

ग्रामीण रुग्णालय अडयाळ येथे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम संपन्न

0
109

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – ग्रामीण रुग्णालय अडयाळ येथे दि.२० जानेवारी २०२६ ला मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय भंडारा च्या वतीने भव्य ताण तणाव  मुक्त, मानसिक आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले .ज्यामध्ये मानसिक आजार, डोकेदुखी,ताण तणाव, उदासपणा, चिंता रोग, बैचेनी, घबराहट,मिर्गी, सेक्स समस्या,व्यसन समस्या, लकवा, मेंदूचे आजार, तसेच हृदय रोग मधुमेह बीपी याची तपासणी तज्ञ मंडळींकडून करण्यात आली. तसेच या शिबिरात आहार, योग विषयक तज्ञ मंडळींकडून सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सोहेल खान यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून मुनेश्वर बोदलकर तंटामुक्ती अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बनसोड (M.O.), डॉ.मनीष बत्रा (डेंटिस्ट), डॉ.निखिल बांगडकर, डॉ.अंकिता शहरे, श्रीमंती चकोले (आहार तज्ञ), श्रीमती ठोंबरे (योगा तज्ञ), डॉ. बांडेबुचे (मानसोपचारतज्ञ)आदी उपस्थित होते.

शिबिरात मान्यवरांनी विविध मानसिक आजारा संदर्भात गावातील लोकांना व रुग्णांना मार्गदर्शन केले. जनरल physician डॉ.बन्सोड, चकोले, आहार तज्ञ, माधुरी ठोंबरे योगा थेरपीस्ट, यांनी मार्गदर्शन केले .

सुत्रसंचालन तुमदेव बनसोड यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतिश भगत (सायकॉलॉजिस्ट) यांनी केले व आभारप्रदर्शन माधुरी साखरवाडे (PSW)यांनी केले. सदर कार्यक्रमास कु.कातोरे (कौन्सेलर), मनिष भारसकरे ,चेतन जाधव, दीपक थाटे (समाजसेवा अधिक्षक), तसेच रूग्णालयातील अधिपरिचारिका वर्षा पाटील, बन्सोड सिस्टर व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here