prabodhini news logo
Home ठळक बातम्या ‘कहाण्या ज्ञानदीपांच्या’ पुस्तक प्रकाशन व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

‘कहाण्या ज्ञानदीपांच्या’ पुस्तक प्रकाशन व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

0
122

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – पुणे:- राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक समूह, पुणे यांच्या माध्यमातून ‘कहाण्या ज्ञानदीपांच्या’ पुस्तक प्रकाशन सोहळा व सुर्योदय प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थेतर्फे महाराष्ट्रातील ७० शिक्षकांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५/२६’ देण्यात आले. हा कार्यक्रम रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले सभागृहात पार पडला.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, मनपा, खाजगी व इतर प्राथमिक शिक्षकांनी, सेवानिवृत्त शिक्षकांनी या पुस्तकात आपले शालेय जीवनातील अनुभव लिहिले आहेत. विद्यार्थ्यांचा विकास करताना, प्रशिक्षणादरम्यान, वेगवेगळ्या शाळांमधील उपक्रम घेताना आलेले अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला आहे. दरवर्षी राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक समूह पुणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षकांना दरवर्षी ही संधी दिली जाते. पुस्तक प्रकाशनाचे हे चौथे वर्ष आहे. यावर्षी पुस्तकाचे संपादक जयश्री जायभाये, संजय घोडके आणि आयुब शेख यांनी सर्व शिक्षकांच्या साथीने या कार्यक्रमाचे नियोजन केले. या उत्कृष्ट उपक्रमाची दखल घेत सुर्योदय प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थेतर्फे या सर्व सत्तर शिक्षकांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५/२६’ जाहीर करण्यात आले.
शिक्षकांनी केलेल्या लेखांचे परीक्षण करण्यासाठी शीतल मदने, प्रणिता कुलकर्णी, प्रीती आबनावे, निलम शेलार, वसुधा नाईक व विद्या सोनवणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी विजया महाडिक, उज्ज्वला फटांगरे, सुनीता कोद्रे, सुरेखा घोमण‌, चित्रा पेंढारकर, आफ्रीन मुल्ला, भारती भदाणे व सरोजिनी देवरे यांनी आर्थिक पाठबळ दिले. सर्व शिक्षकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, सावित्रीबाई फुले व ज्योतीबा फुले प्रतिकृती, वाचनीय पुस्तके व प्रकाशित पुस्तके भेट देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षपदी बळीराम चौरे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शुभांगी चव्हाण उपप्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग (प्राथ.) पुणे महानगरपालिका, राजेंद्र आंधळे राज्य समन्वयक, महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ( ओपन बोर्ड) पुणे, प्रा. डॉ. संदीप सांगळे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, प्रतिभा पाटील संस्थापक अध्यक्षा, सुर्योदय प्रतिष्ठान महाराष्ट्र, विजया महाडिक
सेवानिवृत्त शिक्षिका पुणे महानगरपालिका उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरुमला माने व ज्योती खबाले यांनी केले. आभार प्रदर्शन विजय माने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here