
देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – देसाईगंज येथील राजेंद्र वॉर्डमधील समाज भवनात महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली
यावेळी आमदार मसराम यांनी महर्षी मार्कंडेय यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत समाजाने त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाप्रसंगी मंडळाच्या वतीने आमदार रामदास मसराम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी: धनपाल मिसार, प्रमोद चिलवे, नगरसेवक विकास प्रधान, नगरसेविका राधिका पत्रे, राधेश्याम पत्रे, सागर वाढई, प्रशांत अंकमवार , शैलेश येलगंदवार, स्वप्निल मिसार, गौरव शिलार, तसेच समाजातील मान्यवर, पदाधिकारी, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.















