
शंकरपुर/वडेगांव येथील नवरत्न महिला बचत गटाचे पुढाकार..!
साकोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – साकोली २२ जाने. २०२६ तालुक्यातील ग्रा.पं. वडेगांव अंतर्गत येणारे वार्ड क्र. ०३ म्हणजेचं ‘शंकरपुर’ ! हे गाव नेहमीचं कुठल्या न कुठल्या विषयाला घेऊन नेहमीचं चर्चेत असतो; हे आपणास ठाऊकचं असेल ! आता देखील जणू तसंच काही घडलं अन् गावातील नवरत्न महिला बचत गटातर्फे येथील ७० वर्षीय महिला व गावच्या पाटलीन श्रीमती निर्मला रहांगडाले यांच्या वाढदिवसानिमित्त २१ जाने. बुधवार रोजी त्यांच्या राहत्या घरी त्यांना केक भरवून व शुभेच्छांचा वर्षाव करत वाढदिवस साजरे करण्यात आले.
_निर्मला रहांगडाले यांच्या ‘पाटलीन’ नावामागचा इतिहास :
सुमारे दीड शतकांपूर्वी शंकरपुर येथे वास्तव्याला आलेले पहिले कुटुंबीय म्हणजे रहांगडाले कुटुंबीय. त्यांच्याच घराण्यातील नातसून/सून म्हणजे निर्मला रहांगडाले. पूर्वीपासूनचं रहांगडाले कुटुंबीयाचे मोठे घराणे, मोठे थाट व घरात नोकर-चाकर असल्याने गावातील लोक त्यांना ‘पाटील’ नावाने ओळखत. काळ लोटला व त्यांच्या सासरच्या घराण्यातील परंपरेमुळे निर्मला रहांगडाले यांना ‘पाटलीन’ नाव पडले.
आजही त्यांच्याकडे जमीन-जुमला, दोन मंजीला ईमारत, मुलगा शासकीय सेवेत कार्यरत व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य सुशिक्षित असून आजही त्यांना गावात व गावापलीकडे लोक ‘पाटलीनबाई’ या नावानेचं ओळखतात. मात्र; इतकं सारं असूनही त्यांना कसलही घमंड नसून अगदी साधं राहणीमान व गावात सगळ्यांशी नम्र व्यवहार असल्याने त्यांनी लोकांच्या मनात घर केलयं, हे मात्र त्रिवार सत्य !
वाढदिवस समारंभ प्रसंगी त्यांचे चिरंजीव रविंद्र रहांगडाले, सून किसना रहांगडाले तर नवरत्न महिला बचत गटाचे पदाधिकारी अनुसया राऊत, सुभद्रा पात्रिकर, गुणवंता शेंदरे, ललिता बिसेन, मंगला नंदेश्वर, रंजू सोनवाने, लता वाढवे, रजनी कोचे, सिमा पात्रिकर, मीना शेंदरे, कुंदा सोनवाने, कुंदा पात्रिकर व ग्रामस्थ प्रभा राऊत, रमेश सोनवाने, वासुदेव सोनवाने व बाल गोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.















