prabodhini news logo
Home कोरची आश्रमशाळेतील चिमुकल्या हिमांशीचे अप्पर आयुक्तांनी केले कौतुक

आश्रमशाळेतील चिमुकल्या हिमांशीचे अप्पर आयुक्तांनी केले कौतुक

0
201

नागपूर कार्यालयात रंगला प्रशासकीय संवाद

कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : शासकीय प्रशासकीय यंत्रणेचे कामकाज जवळून पाहता यावे आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने नागपूर येथील मा.आदिवासी अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांच्या कल्पनेतून साकरलेला ‘अपर आयुक्त कार्यालय ओळखा संवादमंच उपक्रमा अंतर्गत कार्यालयात आयोजित शैक्षणिक भेटीत तिसरीतील विद्यार्थिनी कु.हिमांशी महेश नरोटे हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण संवादशैलीने प्रभावित होऊन मा.अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांनी चक्क तिला आपल्या खुर्चीवर बसवून तिचे कौतुक केले.
२१ जानेवारी रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कोरची येथील १० विद्यार्थ्यांच्या पथकाने नागपूर येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना कार्यालयीन कामकाज, प्रशासकीय प्रक्रिया आणि आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
हिमांशीचा आत्मविश्वास आकर्षणाचे केंद्र ठरला.

या दौऱ्यात इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या हिमांशी नरोटे हिच्या निरागस पण तितक्याच प्रभावी बोलण्याने सर्वांना थक्क केले. तिची समज आणि शिकण्याची उत्सुकता पाहून अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांनी तिचे विशेष कौतुक केले. केवळ कौतुकच नाही, तर तिला आपल्या खुर्चीवर बसवून तिच्याशी मनमोकळा संवाद साधला. एका चिमुकलीचा बौद्धिक चाणाक्षपणा पाहून उपस्थित अधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी श्रीमती गिरजा देवीदास उईके सहा. प्रकल्प (शिक्षण) अधिकारी नागपूर उपस्थित होत्या.
“अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविषयी आवड निर्माण होत असून त्यांच्या भविष्यातील वाटचालीस नवी दिशा मिळत आहे.”
— उमाकांत ढोक, मुख्याध्यापक, आश्रमशाळा कोरची.
सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव
हिमांशी व तिचे वर्गशिक्षक यांच्या या यशाबद्दल गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) ,डॉ प्रभू सादमवार सहा.प्रकल्प अधिकारी (शिक्षण) गडचिरोली यांनी तिचे अभिनंदन केले आहे. हिमांशीच्या या आत्मविश्वासामुळे कोरची परिसरात तिचे कौतुक होत असून, आश्रमशाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here