
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत आयोजित बिट स्तरीय क्रीडा शालेय स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेमध्ये भिवकुंड विभागाच्या प्राथमिक शाळेच्या खो-खो संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली.
संपूर्ण स्पर्धेदरम्यान भिवकुंड विभागाच्या संघाने शिस्तबद्ध खेळ, वेगवान हालचाली आणि सांघिक समन्वय यांचे उत्तम दर्शन घडवले. अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात करत त्यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संघातील सर्व खेळाडू, मार्गदर्शक शिक्षक व क्रीडा प्रशिक्षकांचे सर्व स्तरातून खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे. या विजयामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यातील जिल्हास्तरीय व विभागीय स्पर्धांसाठी प्रेरणा मिळाली आहे.
या यशासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग आणि शिक्षकांनी संघाचे विशेष कौतुक केले असून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.















