
खमारी येथे श्रीमद् भागवत सप्ताह शुभारंभ
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – भागवत सप्ताह म्हणजे महर्षी व्यास ऋषी रचित श्रीमद भागवत या संपूर्ण ग्रंथाचे एक सप्ताह नित्य नियमाने वाचन, पठन करणे. किंवा वारकरी संप्रदायातील श्रीमद, ज्ञानेश्वरी, गीता यांचा अभ्यास आणि प्रभुत्व असलेले कथाकार, किर्तनकार यांच्याकडून संपूर्ण भागवत कथा स्वरुपात एकाच सप्ताहात वाचन करणे व ते भाविकांनी श्रवण करावे. भागवत सप्ताह हा एक शक्तीशाली आध्यात्मिक अनुशासन मानला जातो. तो केवळ कथाकथना पलिकडे असतो. त्यामुळे गावात जातीय सलोखा निर्माण होऊन परिसर शुद्ध होत असते. म्हणून आध्यात्मिक विकासाला गती देणारा आणि मोक्षाचा दाखविणारा आहे असे प्रतिपादन आदर्श शेतकरी बाबुराव मोहरकर यांनी केले.ते वैनगंगेतीरी हनुमान मंदिर खमारी (बुटी) च्या प्रांगणात आयोजित श्री सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान समिती खमारी (बुटी) तसेच समस्त ग्रामवासी यांच्या वतीने कथामृत संगितमय श्रीमद् भागवत सप्ताहाच्या उद्घाटन करतांना बोलत होते.
श्री महाविर हनुमान मुर्तींचे अभिषेक, श्रीमद् भागवत अधिष्ठानाची स्थापना व उद्घाटन आदर्श शेतकरी बाबुराव मोहरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अज्ञान राघोर्ते होते. प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिव किनारकर, प्रवचनकार हभप. हरिश्चंद्र भुसारी महाराज, हभप. काशिनाथ घोनमोडे, पंचायत समिती सदस्य किशोर ठवकर, ग्राम पंचायत सदस्या सौ. दिपमाला फेंडर, जयश्री समरित, मेघा शनवारे, विरंगणा पडोळे, विविध सेवा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत समरित, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी ओमप्रकाश मडामे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालाराम पवनकर, परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक झिबल ठवकर, उत्तम ठवकर, डॉ. राघोर्ते, हनुमान मंदिर देवस्थान समितीचे सदस्यगण गुलाब मोहरकर, उपासराव शनवारे, भगवान सेलोटे, ताराचंद नान्हे, देवानंद शिवणकर व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून, मार्ल्यापण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विज्ञान युगात आध्यात्मिकतेची जोड असणे गरजेचे आहे. हिंदू संस्कृती जोपासण्यासाठी भक्ती मार्ग आवश्यक आहे. तसेच विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.तसेच समस्त भाविक बांधव व नागरिकांनी जास्तीत -जास्त संख्येने अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घेऊन तन-मन धनाने हनुमान मंदिराच्या बांधकामाकरीता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हरिपाठ व त्यावेळी यजमान म्हणून गजानन पेशने व कमल पेशने यांनी स्थान भुषविले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास केजरकर व प्रास्ताविक सचिव सत्यानंद रेहपाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेश काळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष खुशाल शहारे, उपाध्यक्ष वामन नागपुरे, सेवक बोरकर, गजानन पेशने, दिलशाम मोहरकर, चंद्रभान हरडे, चंद्रकुमार भुरे, महेश शहारे, राजू शेंडे, मोहन आग्रे, बाला मेश्राम, नरेश समरित, संजय केजरकर, विठ्ठल मोहरकर, राजकुमार मारवाडे, सुनिल फेंडर, प्रभाकर पवनकर, सुखदेव धांडे, शशिकला बोरकर, यशोदा मोहतुरे, ज्योती रेहपाडे, नेहा पेशने, लक्ष्मी बोरकर, सविता आग्रे, पंचफुला मोहतुरे, सत्यभामा मारवाडे, शांता मोहरकर, मनाबाई हरडे, शिलाबाई बोरकर, सृष्टी रेहपाडे, शांता ठवरे, मंजुळा पवनकर, मेहेरा काळे, उषा पवनकर, उमराव मोहरकर तसेच श्री सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान समितीच्या पदाधिकारी व खमारी ग्रामवासी यांनी केले आहे.















