prabodhini news logo
Home चंद्रपूर नागभीड तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध; आरोग्य सेवेला मोठा आधार – नागरिकांमध्ये समाधान,...

नागभीड तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध; आरोग्य सेवेला मोठा आधार – नागरिकांमध्ये समाधान, रुग्णवाहिकेचे लोकार्पण…

0
83

नागभीड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नागभीड तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असल्याची माहिती काँग्रेस पदाधिकारी तथा लक्ष्मी नागरी पतसंस्था अध्यक्ष विनोद बोरकर यांनी दिली व रुग्णवाहिकेची मागणी केली यावर जनतेच्या आरोग्य सेवेसाठी तत्परता दाखवत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.

ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, हा मानवतावादी हेतू ठेवून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नागभीड तालुक्यात अनेक गावांमध्ये तातडीच्या वैद्यकीय सुविधांचा अभाव असून, गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात नेताना मोठी अडचण निर्माण होत होती. अशा परिस्थितीत ही रुग्णवाहिका ‘जीवनदायी ठरावी’ अशीच आहे. आता अपघात, प्रसूती, गंभीर आजार अशा प्रसंगी रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रुग्णवाहिकेमुळे गोरगरीब, शेतकरी, मजूर व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आरोग्य सेवेत आमूलाग्र सुधारणा होणार आहे. जनतेच्या दुःखात धावून जाणे हेच खरे सत्कर्म या जाणिवेतून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.

यावेळी काँग्रेस पदाधिकारी तथा लक्ष्मी नागरी पतसंस्था अध्यक्ष विनोद बोरकर, ब्रम्हपुरी उपनगराध्यक्ष डॉ. नितीन उराडे, माजी सभापती प्रफुल खापर्डे, चिमूर काँग्रेस पदाधिकारी विजय गावंडे, जुनैद खाँन यांचेसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here