prabodhini news logo
Home ठळक बातम्या दादा गेले! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

दादा गेले! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

0
112

अमोल जगताप सह संपादक प्रबोधिनी न्युज – जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी, मनाला चटका लावणारी आहे. या दुर्घटनेमुळे मन सुन्न झाले आहे, अशा शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here