prabodhini news logo
Home कोल्हापूर महाराष्ट्राचे प्रभावी लोकनेते नेतृत्व हरपले : रजनी मगदूम

महाराष्ट्राचे प्रभावी लोकनेते नेतृत्व हरपले : रजनी मगदूम

0
82

कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदार मा. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्राचे लाडके, लोकाभिमुख व आदर्श नेतृत्व हरपले असून राज्याच्या राजकारणात कधीही न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम यांनी केले. त्या कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे आयोजित शोकसभेत बोलत होत्या. अजितदादा पवार हे जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्य करणारे नेते होते. त्यांना प्रशासनाचा प्रदीर्घ व सखोल अनुभव होता. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी त्यांनी अनेक लोककल्याणकारी आणि विकासाभिमुख निर्णय घेतले. त्यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्राने एक अनुभवी, कर्तबगार आणि दृढ नेतृत्व गमावले आहे. यावेळी कौन्सिल ऑफ एज्युकेशनअंतर्गत देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, शहाजी लॉ कॉलेज तसेच सौ. पार्वतीदेवी कुंभार नर्सिंग कॉलेज यांच्या वतीने ना. मा. अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. शोकसभेला कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील, पार्वतीदेवी कुंभार ऑफ नर्सिंग चे प्राचार्य डॉ. भालचंद्र कुलकर्णी, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी, उपप्राचार्य कॅप्टन डॉ. आर. एस. नाईक, उपप्राचार्य डॉ. एस. जे. फराकटे, रजिस्ट्रार श्री. मोहन पोवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here