
नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांनी सभापतीच्या कॅबिनमध्येच केला जाहिर निषेध
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्राराचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच विमान अपघातात दु:खद निधन झाले त्यामूळे तिन दिवसाचा शासकिय दु:खवटा शासनाने जाहिर करून सर्व कार्यक्रम रद्द केले असतांना सुद्धा खुर्चीच्या हव्यासापोटी भान हरपून आजच नगर परिषद सभापती अनिल कुनघाडकर यांनी बांधकाम सभापती पदाचा पदग्रहण सोहळा घेतला ही बाब महायुती सरकार मधील पदाधिकारी व सत्ताधा-यांना अशोभणीय असल्याने त्यांच्याच कॅबिनमध्ये जाऊन नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांनी सर्वासमोर जाहिर निषेध केला.
विशेष म्हणजे नगर परिषद सभागृहात आजच अजितदादा पवार यांचा श्रध्दांजली कार्यक्रम व बांधकाम सभापतीं अनिल कुनघाडकर यांचा स्वत:चा सभापती पदाचा पदग्रहण सोहळा पन आयोजीत करण्यात आला होता या दोन्ही कार्यक्रमाची माहिती नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांना देण्यात आली नव्हती. काही कामानिमीत्य बाळू टेंभुर्णे नगर परिषदेत गेले असता सदर बाब त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी लगेच सभापतीचे कॅबिन गाठून सर्वासमक्ष सभापती व सत्ताधारी पक्षाचा जोरदार निषेध केला आहे.
निषेध करतांना टेंभुर्णे म्हणाले की, राज्यात शासनाने तिन दिवसाचा शासकिय दुखवटा जाहिर केला आहे असे असतांना पदग्रहणा सारखे कार्यक्रम कसे काय आयोजीत केल्या जातात? असे कार्यक्रम घेणे योग्य नाही, हे सत्ताधा-यांसाठी अशोभणीय कृत्य आहे म्हणून मी तिव्र शब्दात निषेेध करतो असेही म्हणाले.















