prabodhini news logo
Home ठळक बातम्या आपल्या प्रगतीचा आणि अधोगतीचा मार्ग स्वतःच्याच हाती: भदंत पय्याबोधी थेरो

आपल्या प्रगतीचा आणि अधोगतीचा मार्ग स्वतःच्याच हाती: भदंत पय्याबोधी थेरो

0
116

वसमत ​प्रतिनिधी : धानोरा (भोगाव): माणूस आपल्या आयुष्यातील अपयशासाठी किंवा दुःखासाठी अनेकदा दुसऱ्याला किंवा नशिबाला दोष देत असतो. मात्र, भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार, कोणताही दुसरा व्यक्ती माणसाची अधोगती करू शकत नाही आणि कोणी त्याला जबरदस्तीने सद्गतीलाही नेऊ शकत नाही. आपली प्रगती आणि अधोगती पूर्णतः आपल्याच कर्मावर अवलंबून असते, असे प्रतिपादन भदंत पय्याबोधी थेरो यांनी वसमत तालुक्यातील धानोरा ( भोगाव ) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे दि २८ जानेवारी रोजी तिसऱ्या बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेल्या कार्यक्रमात धम्म देशाना देतांना भदंत पय्याबोधी थेरो हे बोलत होते .
दरम्यान भगवान बुद्धांच्या विचारांचा दाखला देत भंतेजी म्हणाले की, खुद्द बुद्ध सुद्धा स्वतःला केवळ ‘मार्गदाता’ मानतात, ‘मोक्षदाता’ नाही. “मी तुम्हाला मुक्त होण्याचा मार्ग दाखवू शकतो, पण त्या मार्गावर चालण्याचे कष्ट तुम्हालाच घ्यावे लागतील,” हा बुद्धांचा संदेश त्यांनी अधोरेखित केला. पंचशीलाचे पालन (दारू, हत्या, चोरी, व्यभिचार आणि असत्य यांपासून दूर राहणे) केल्यास माणसाची प्रगती जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​’उपेक्षा’ भाव धारण करणे हीच मानसिक शांतीची गुरुकिल्ली आहे.
​स्वतःला बदलणे हाच खरा धम्म
धम्म हा केवळ ग्रंथ वाचण्यासाठी किंवा इतरांना उपदेश करण्यासाठी नसून, तो स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आहे. आपल्या पायाला दगड लागल्यावर आपण दगडाला दोष देतो, पण आपण जमिनीवर पाहून चाललो नाही ही आपली चूक मान्य करत नाही. हा मानवी स्वभाव बदलून अंतर्मुख होणे गरजेचे आहे. बाह्य भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख आणि मानसिक शांतता अधिक मोलाची आहे.
​व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन
मानवी जन्म अत्यंत दुर्मिळ असून तो व्यसनांमध्ये वाया घालवू नका, असे आवाहनही भंतेजींनी केले. मद्यपान, तंबाखू आणि जुगार यांसारखी व्यसने केवळ शरीरच नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतात. जीवनात प्रगती करण्यासाठी आत्मशिस्त आणि इंद्रियांवर ताबा मिळवणे आवश्यक आहे. या धम्म परिषदेच्या अध्यक्ष स्थानी भदंत महाविरो थेरो काळेगाव , प्रमुख मार्गदर्शक भदंत पय्याबोधी थेरो खुरगांव नांदेड , भदंत पय्यानंद थेरो लातूर , भंत्ते सारीपुत्र , भंत्ते श्रद्धानंद आदी भिक्खूसंघ श्रामणेर धम्मपीठावर उपस्थित होते . भदंत पय्यानंद थेरो हे धम्म परिषदेचे उद्घाटन प्रसंगी म्हणाले की, धम्म परिषद चिंतन करण्यासाठी असलेल्या एक मोठा उत्सव आहे . धम्म परिषद हे या आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवण्यासाठी किंवा आपली संस्कृती लोकांच्या दाखविण्यासाठी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी धम्म परिषद आहेत . भंत्ते सारीपुत्र , भंत्ते श्रद्धानंद यांनी जनसमुद्यांना धम्म देशना दिली . भदंत महाविरो थेरो यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी पंचशील ,अष्टांग मार्ग यांचे पालन केल्यास मानवाचे जीवन सुख कर होते . सकाळी ९:३० वाजता सरपंच एंगडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण केले . त्यानंतर तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून धम्म मिरवणूक काढण्यात आली .या धम्म मिरवणुकीत भिक्खू संघ श्रामणेर व शुभ्र वस्त्र परिधान करून उपासक उपासिका सहभाग घेवून तथागत गौतम बुद्ध आणि बोधी सत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो ,असे जयघोष करत धम्म रॅली करण्यात आली .बुद्ध धम्म परिषद समितीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहिली श्रद्धांजली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज एंगडे यांनी केले. या धम्म परिषदेला रिपाईचे मधूकर मांजरमकर , मुगोजी खंदारे, सरपंच राजरत्न कुंटे, बालाजी शिवभगत,श्रीरंग थोरात, विजयकुमार एंगडे, चंद्रमुनी मस्के ,बालाजी मस्के यांच्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक सभागृह समितीचे पदाधिकारी व धानोरा परिसरातील उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते ही धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी अमोल मस्के, सिद्धार्थ मस्के , लिंबाजी मस्के , निलेश जोंधळे, गंगाप्रसाद मस्के, पांडुरंग इंगळे , विनोद एंगडे,घाटे आदींनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here