prabodhini news logo
Home एटापल्ली कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव भाकपा यांच्या हस्ते परसलगोंदी व हेडरी धान...

कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव भाकपा यांच्या हस्ते परसलगोंदी व हेडरी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

0
110

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – एटापल्ली : आदिवासी विकास महामंडळाच्या उडेरा केंद्राअंतर्गत परसलगोंदी व हेडरी गावात धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. सदर उद्घाटन कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांच्या हस्ते करण्यात आले.

परसलगोंदी व हेडरी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी धान खरेदी केंद्र गावातच सुरू करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडे केली होती. या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा भाकपाने केल्यामुळे यावर्षी परसलगोंदी धान खरेदी केंद्र भाकपाने मंजूर करवले, तर मागील वर्षी रेखणार आणि काही क्षेत्रातील नागरिकांच्या मागणीनुसार हेडरी धान खरेदी केंद्रही भाकपाच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आले. नागरिकांच्या संघटित मागणीला मिळालेले हे ठोस यश मानले जात आहे.

या उद्घाटनप्रसंगी प्रमुख उपस्थितीत कॉ. सुरज जक्कुलवार (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), रितेश जोई (तालुका सहसचिव), कॉ. विशाल पुज्जलवार, हेडरीचे उपसरपंच राकेश कवडो, रेखणार दशरथ उसेंडी, दानू हिचामी तसेच टीडीसीचे कर्मचारी प्रशांत डांगे, परसलगोंदी चे बबन मटामी, भूमिया गणेश मटामी, चंदू गावडे, मनोज पदा, दुलसा पदा, टिल्लू नरोटी, गुलाब सिडाम, बालाजी हिचामी, शिवाजी पदा, माधव नरोटी आदी मान्यवर उपस्थित होते.

परसलगोंदी व हेडरी गावातच धान खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी उडेरा केंद्रापर्यंत जावे लागत होते. मात्र आता गावातच धान विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च व त्रासात मोठी बचत होणार आहे.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थांनी आदिवासी विकास महामंडळासह धान खरेदी केंद्र मंजूर करून देणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे व संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. शेतकरी, मजूर व आदिवासी जनतेच्या हितासाठी भाकपा पुढेही अशाच प्रकारे संघर्ष व पाठपुरावा करत राहील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here