prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपुरात भव्य रन फॉर युनिटी; राष्ट्रीय एकात्मता व स्वातंत्र्य चेतना महोत्सव अंतर्गत...

चंद्रपुरात भव्य रन फॉर युनिटी; राष्ट्रीय एकात्मता व स्वातंत्र्य चेतना महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

0
129

चंद्रपूर महानगरातील सर्व शैक्षणिक संस्था व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

रवि आत्राम तालुका प्रतिनिधी, भद्रावती : चंद्रपूर महानगरातील २० शैक्षणिक संस्था व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ फेब्रुवारी २०२६ रोज सोमवार ला स्थानिक गांधी चौक ते जटपूरा गेट पर्यंत सकाळी ठीक ८:०० वाजता भव्य “राष्ट्रीय एकात्मता दौड” (Run for Unity) चे आयोजन करण्यात आले आहे.

लोहपुरुष सरदार वल्लभभाईजी पटेल, जननायक बिरसाजी मुंडा यांच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत तसेच भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणास्रोत असलेले ‘वंदे मातरम्’ या गीतरचनेलाही १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या १५० वर्षाच्या गौरवशाली इतिहासाला देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करुन साजरे केले जात आहे. यानिमित्त चंद्रपूर या ऐतिहासिक शहरात राष्ट्रीय एकात्मता व स्वातंत्र्य चेतना महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या २ फेब्रुवारी रोज सोमवारला सकाळी ८ वाजता चंद्रपूरकर राष्ट्रीय एकात्मता दौड मधे सहभागी होणार आहेत व महानगरातील महाविद्यालय स्तरावर निबंध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तर दिनांक ५ फेब्रुवारी रोज गुरुवारला स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात देशभक्तीपर आधारित समूह नृत्य स्पर्धा तसेच देशभक्तीपर आधारित समूहगीत गायन स्पर्धा, अशा स्पर्धांचे आयोजन केले गेले आहेत. या स्पर्धांमध्ये महानगरातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्पर्धेनंतर लगेच विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना व समूहाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल.

चंद्रपूर महानगरात होणाऱ्या या राष्ट्रीय एकात्मता व स्वातंत्र्य चेतना महोत्सवात चंद्रपुरकरांनी सक्रिय होत राष्ट्रीय एकात्मता दौड (RUN FOR UNITY) मधे सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरातील २० शैक्षणिक संस्था, महाविद्यालय व प्राचार्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here