prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतु

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतु

0
102

झाली पानगळ सारी
वसंत ऋतु आला
आंबाही पानोपानी
मोहरुन गेला

कोकीळेचा गुंजारव
वाटे कानाला मधुर
इवलीइवली रानपाखरे
लावतात धुंद स्वर

आज या सृष्टीला
नवचैतन्य आले
झाडांना फुटे पालवी
जिकडे तिकडे रंगीत फुले

शिशिराने उधळण केली
रंगबिरंगी फुलांची
द्राक्षे, संत्री मोसंबी
अनेकविध फळांची

सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here