prabodhini news logo
Home चंद्रपूर क्रीडा संस्कृती ही शिस्त, संघभावना व जिद्द निर्माण करणारी; सिंदेवाही–लोणवाही नगरपंचायत आयोजित...

क्रीडा संस्कृती ही शिस्त, संघभावना व जिद्द निर्माण करणारी; सिंदेवाही–लोणवाही नगरपंचायत आयोजित क्रीडा महोत्सवाचा समारोप…

0
80

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – सिंदेवाही – लोणवाही नगरपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रीडा महोत्सवाचा समारोप काल मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी या क्रीडा महोत्सवातील विजेत्या व सहभागी खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी खेळाडूंशी संवाद साधत क्रीडा संस्कृती ही शिस्त, संघभावना व जिद्द निर्माण करणारी असते असे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील युवकांना खेळाची योग्य संधी मिळाल्यास ते राज्य व देशपातळीवर चमकदार कामगिरी करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.

सिंदेवाही – लोणवाही नगरपंचायत स्थापना दिनानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाचे वर्षी देखील ४ दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, ब्रम्हपुरी नगराध्यक्ष योगेश मिसार, उपनगराध्यक्ष पूजा रामटेके, माजी सभापती मुन्नाजी जयस्वाल, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, मुख्याधिकारी विवेक उपले, विरेंद्र जयस्वाल, नगरसेवक दिलीप रामटेके, किशोर भरडकर, अमृत मडावी, वैशाली पुपरेड्डीवार, नीता रणदिवे, मीनाक्षी मेश्राम, अस्मिता जुमनाके, श्वेता मोहुर्ले आदी उपस्थित होते.

सिंदेवाही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर स्तरावर आवश्यक असलेले क्रीडांगण, प्रशस्त रस्ते, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इ – लायब्ररी, पोलिस स्टेशन व ग्रामीण रुग्णालयाकरिता प्रशस्त इमारत आणि सोबतच शहरातील मुख्य अशा शिवाजी महाराज चौक व तलाव सौंदर्यकरणासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून दिला. पुढेही अत्यावशक निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला.

या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, रस्सीखेच, व्हॉलीबॉल, २००, ४०० मीटर धावणे अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. शहरातील सर्व शासकीय कर्मचारी, पत्रकार, व्यापारी संघाच्या स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. विजेत्या संघ व खेळाडूंना सन्मानचिन्हे, प्रमाणपत्रे बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर तयाकंडो कराटे स्पर्धेत विजेता ठरलेल्या कृत्तिका बल्लेवार हिचा सत्कार करण्यात आला, तर आयोजित स्पर्धेत पंच म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पंचांचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास नगरपंचायत पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, क्रीडा प्रेमी नागरिक, शिक्षक, युवक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here