
सूर्य मावळतीला झुकतो हळुवार,
आकाशावर उमटते केशरी शृंगार l
दिवसाचा थकवा विसावतो क्षणी,
सांजवेळ येते शांततेची सरी.
पक्षी परतीच्या वाटेवर गातात गीत,
घराघरात उजळते दिव्यांचे प्रीत. I
मनात विचारांची मंद लहर,
सांजवेळ सांगते..थांब जरा,सावर.
दिवस गेला तरी आशा उरते,
उद्या नव्या पहाटी स्वप्ने फुलती l
उषा रामाजी ढोके(भुरे)
ब्रम्हपुरी















