prabodhini news logo
Home ठळक बातम्या प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर – आंबेगाव कात्रज येथील ई गटाच्या निवडणुकीत...

प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर – आंबेगाव कात्रज येथील ई गटाच्या निवडणुकीत ईव्हीएमच्या माध्यमातून हुकूमशाहीचा संशय; न्यायालयीन लढाईला वेग

0
127

पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर, आंबेगाव कात्रज येथील ई गटाच्या निवडणुकीत उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी या निकालाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेत हेरफार झाल्याचा ठाम संशय व्यक्त केला जात असून, लोकशाही मूल्यांवर घाला घालणारी ही बाब अत्यंत गंभीर आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उमेदवार वसंत मोरे यांनी न्यायालयात दाद मागितली असून, या प्रकरणी स्मॉल कॉझेस कोर्ट, पुणे यांनी ई गटातील सर्व उमेदवारांना न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे.
कोर्टाकडून दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात
प्रशांत कांबळे आम आदमी पार्टी
प्रकाश कदम – राष्ट्रवादी (AP गट)
व्यंकोजी खोपडे भारतीय जनता पार्टी
स्वराज बाबर शिवसेना (शिंदे गट)
अक्षय निंबाळकर भारतीय शेतकरी कामगार पक्ष
शहाबाज खान (अपक्ष)
तुकाराम गोगावले, विराज शोले, नरेंद्र पारखे
वंचित बहुजन आघाडी
यांसह अनेक उमेदवार न्यायालयात हजर राहणार की नाही, हे येत्या तारखेला स्पष्ट होईल.
आम आदमी पार्टीचे उमेदवार प्रशांत कांबळे यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “लोकशाही टिकवायची असेल, तर हुकूमशाही प्रवृत्तींचा गळा दाबलाच पाहिजे. या भागातील नागरिक अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जात आहेत. त्या अन्यायाविरोधात आम्ही निवडणूक लढवली. मात्र मतांमध्ये झालेली मोठ्या प्रमाणावरील फेरफार ही बाब धक्कादायक आहे.
निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित होत असून, ई गटाची निवडणूक पुन्हा घ्यावी असा सूर उमेदवारांमध्ये वाढू लागला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here