
5 फेब्रुवारी 2026 कुरूड
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – कुरूड येथे पारंपरिक पद्धतीने बैलांची जंगीशंकर पट मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रामदास मसराम उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. ग्रामीण संस्कृती जपण्यासाठी अशा पारंपरिक खेळांचे आयोजन महत्त्वाचे असून यामुळे युवकांना सकारात्मक दिशा मिळते, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार कृष्णा गजबे , नितीन राऊत,धनपालजी मिसार सर, गजानन सेलोटे, निखिल चव्हाण,सुनील भाऊ पारधी, शंकरजी पारधी, वसंता दोनाडकर, पिल्लारे साहेब, दिलीपजी नाकाडे सर, पांडे साहेब, योगेशजी नाकतोडे, महादेवजी ढोरे,दामोदरजी पटले, सौ.प्रतिभा उईके, मंगेशजी मडावी पो. पा. कुरुड तसेच परिसरातील नागरिक, शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैलांची जंगीशंकर पट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. आयोजकांनी यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमदार रामदास मसराम यांनी त्यांचे कौतुक केले तसेच भविष्यातही अशा सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.















