
जालना प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त जालना शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंबड चौफुली, मंठा बायपास रोड येथील कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय आणि संघर्षमय जीवनकार्यावर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यात माता रमाईंचे योगदान कसे अतुलनीय होते, यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी दिपक डोके (मराठवाडा उपाध्यक्ष), राजेंद्र खरात (जिल्हा संघटक), विलास नरवडे (तालुका उपाध्यक्ष), मैना खंडागळे, सुशिला गायकवाड, निला काकडे, मालती दाभाडे, सोनाली चव्हाण, रोहिणी, सत्यपाल गायकवाड, अमोल लोखंडे, विलास भिंगारे, गौतम काकडे, संजय आदमाने, ज्ञानेश्वर बोबडे, मिलिंद सरकटे, पांडुरंग मगर, बाबासाहेब आटोळे, जी. एस. गाडेकर, गौतम पाडमुख, संकेत दाभाडे, बाळासाहेब म्हस्के आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माता रमाईंच्या स्मृतींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.















