prabodhini news logo
Home ठळक बातम्या ‘मोदींचे कोणते काळे गुपित ट्रम्प यांच्याकडे?’ प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!

‘मोदींचे कोणते काळे गुपित ट्रम्प यांच्याकडे?’ प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!

0
79

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – “एकीकडे भारत विश्वगुरू बनण्याच्या बाता मारल्या जात असताना, प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांचे चेले बनले आहेत,” अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदींना ब्लॅकमेल करत असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी सोशल मीडियाद्वारे केला आहे.

नेमके प्रकरण काय?

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, ट्रम्प यांच्याकडे मोदींच्या अशा काही ‘काळ्या कारनाम्यांची’ माहिती आहे, ज्याचा वापर करून ते भारतावर दबाव आणत आहेत.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये टोकदार प्रश्न उपस्थित केले आहेत. “मी नरेंद्र मोदींचे राजकीय करिअर संपवू शकतो,” असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे, ज्यामुळे मोदी घाबरत आहेत? असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मोदींच्या कोणत्या ‘काळ्या पत्रिके’मुळे ट्रम्प त्यांना ब्लॅकमेल करत आहेत आणि त्याची शिक्षा संपूर्ण देशाला का भोगावी लागत आहे? अमेरिकेच्या दबावाखाली येऊन मोदी सरकार देशाच्या हिताशी तडजोड करत आहे का? असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. विश्वगुरू बनायला निघाले होते, पण ट्रम्पचे चेले बनले! मोदींचे असे कोणते ‘काळे गुपित’ ट्रम्प यांना माहित आहे? मोदीजी, देश उत्तर मागत आहे! असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटर पोस्ट करत सवाल केला आहे.

पंतप्रधान मोदी आणि भाजपवर करण्यात आलेल्या या थेट आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे ट्रम्प यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांकडून मोदींवर टीका केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला असून, भाजपकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here