
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – 23 वे वर्ष आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा व गौरव फाउंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी 21 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न होत आहे.
आस्था तर्फे आयोजित सदर सोहळ्याला अध्यक्ष नरेशबाबू पुगलिया, माजी खासदार, उद्घाटक पुलकित सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर, प्रमुख अतिथी मा. दिनेश कोचर, महामंत्री श्री. पार्श्वनाथ जैन मंदिर भद्रावती, सत्कारमुर्ती मा. संगीता खांडेकर, महापौर महानगर पालिका चंद्रपूर,व मा. प्रशांत दानव, उपमहापौर महानगर पालिका चंद्रपूर, प्रमुख पाहुणे मा. धनंजय साळवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर, मा. सुभाष शिंदे, अध्यक्ष डेबू सावली वृद्धाश्रम चंद्रपूर प्रामुख्याने उपस्थित आहेत.
आस्था तर्फे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात दिव्यांग उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन दिव्यांग बांधवांचे विवाह जोडण्याकरिता प्रयत्न करतात. दिव्यांगत्वावर मात करून यशस्वी जीवनाकरिता जीवनसाथी तेवढाच महत्त्वाचा असतो. असणाऱ्या दिव्यांगत्वापेक्षा क्षमतेच्या बळावर यशस्वी जीवन जगण्याचा तो सर्वात मोठा आधारस्तंभ असतो. याच आधारस्तंभाकरीता आस्था मागील 22 वर्षापासून प्रयत्न करत आहे. 22 वर्षात 451 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांचे विवाह जोडून सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांना विवाहबद्ध करण्याचे हे 23 वे वर्ष आहे. गौरव फाउंडेशनचे अध्यक्ष मा. नरेंद्रबाबू पुगलिया तथा संपूर्ण पुगलीया परिवार आस्थाच्या पाठीशी आर्थिक दृष्ट्या उभे आहे. प्रत्येक जोडप्याला रु. 50000/- पर्यंत माहेरचा आहेर म्हणून साहित्य वितरण करण्यात येते, तसेच डेबू सावली चंद्रपूर वृद्धाश्रमाचे प्रमुख मा. सुभाष शिंदे प्रत्येक वधू करिता माहेरचे सोन्याचे मंगळसूत्र देतात. एक ना अनेक हात या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला लागतात. विवाहाच्या पहिल्या दिवशी सर्व वधू-वरांना हळद तथा मेहंदी लावण्यात येते.
या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पार पडल्या जाते. ज्यामध्ये सर्व कलावंत स्वतः निस्वार्थपणे नृत्य व गीत गातात. या कार्यक्रमाचे सर्व अधिकार आस्था तथा गौरव फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांकडे असतो. त्याकरिता अध्यक्ष नगीना फुगलीया, उद्घाटक अर्चना आशिष ठाकरे, नगराध्यक्ष न.प. वरोरा, प्रमुख अतिथी राखी दिनेश कोचर, प्रसिद्ध भजन गायिका हिंगणघाट, इचराज कांतीलाल जैन, ज्येष्ठ नागरिक, भारती शिंदे, संचालिका, डेबूसावली वृद्धाश्रम चंद्रपूर , प्रमुख मार्गदर्शिका मा. डॉ. नसरीन मावानी, स्त्रीरोग तज्ञ चंद्रपूर, मा. मंजुषा भास्करवार, कौटुंबिक मार्गदर्शिका, पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत यांची उपस्थिती राहणार आहे.
या सुरेल कार्यक्रमाची सुरुवात आवाजाच्या ध्वनी मनीषा पडगिलवार हे करणार आहेत. चंद्रपूरची आराध्य दैवता माता महाकांली यांच्या दर्शनाने 21 जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. आणि यशस्वी जीवनाची सुरुवात करणार आहेत. दु. 3 वा. दिव्यांग वधु वर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या संपन्नते साठी नरेंद्र पुगलिया अध्यक्ष गौरव फाउंडेशन, अरुण बाफना, सचिव गौरव फाउंडेशन, संजयकुमार पेचे, अध्यक्ष आस्था ट्रस्ट, वरोरा महेश भगत, सचिव आस्था ट्रस्ट वरोरा, रोहित पुगलिया, राज पुगलिया, अशोक कोठारी, विनोद भोयर, यशवंत देशमाने, सुहास देवडे, महेश मॅकलवार, अमोल मारोतकर, आतिश आक्केवार हे परिश्रमित आहेत. कार्यक्रमात जय बजरंग क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ, बाबूपेठ व रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन चंद्रपूर, यांचे कार्यकर्ते रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी करून कार्यक्रमाची सांगता करतात.















