
महाशिवरात्री ची पवित्र पहाट, नदीकाठी भक्तीचा थाट l
ओवाळूनि जल शिवलिंगाला, मनात जागे श्रद्धेची वाट l
नदीच्या काठावर घंटानाद,
“हर हर महादेव “चा निनाद l
उपास..तपास आणि नामस्मरण ,
भक्तीने भरतो प्रत्येक चरण l
हिंदू संस्कृतीची ही परंपरा,
निसर्गाशी जडले प्रत्येका चे कर l
उषा रामाजी ढोके
ब्रम्हपुरी















