prabodhini news logo
Home ठळक बातम्या भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; ॲड....

भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!

0
129

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न करत जोरदार हल्ला चढवला आहे. भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. याविरोधात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या व्यापार शुल्काबाबत (Tariffs) केलेल्या विधानांचा संदर्भ देत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी विचारले की, मोदीजी, डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे खरे आहेत का? भारताला व्यापारी क्षेत्रात अमेरिकेच्या दबावाखाली झुकवले जात असल्याचा आरोप त्यांनी या पोस्टद्वारे केला आहे.

देशाला गुलाम बनवत आहात का?

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांना विचारले की, मोदी, तुम्ही देशाला अमेरिकेचे गुलाम का बनवत आहात? आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताची प्रतिमा मलीन होत असून सरकार अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याची टीका त्यांनी केली.

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी गंभीर प्रश्न देखील उपस्थित केले आहे. त्यांनी विचारले की, अमेरिकेला मोदी यांच्याबद्दल असे कोणते काळे गुपित (Secret) माहित आहे की, तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या तालावर मुजरा करत आहात? तसेच, ही मानसी सोनी कोण आहे? असा थेट सवाल करत त्यांनी एका जुन्या आणि वादग्रस्त विषयाला हात घातला आहे. विशेषतः भारत-अमेरिका व्यापार संबंध आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here