
मुहुर्ताच्या भानगडीत न पडता
शिवबा लढले अमावस्येच्या रात्री ;
सा-या लढ्यात विजय प्राप्त करुन,
लावली जुलमी व्यवस्थेला कात्री.
जीवनात दिला नाही कधी
कर्मकांड, अंधश्रद्धेला थारा ;
वैज्ञानिक दृष्टीकोनातून साधला,
सकलांच्या जगण्याचा निवारा.
सामाजिक न्याय स्विकारून
परस्त्रीला मातेसमान मानले ;
स्त्री भावनेची जाणीव ठेवून,
स्त्री अस्तित्वाचे महत्त्व जाणले.
जाणता राजा छत्रपती शिवराय
दिला सकलांना समान न्याय ;
जाती धर्माच्या भिंती तोडून
दूर केला जनतेवरील अन्याय.
झाडे तोडण्यावर घातली बंदी
निगा पर्यावरणाची राखली ;
भविष्यातील कित्येक पिढ्यांनी ,
स्वराज्याची गोड फळे चाखली.
शेतक-यांच्या शेतातील पीकाला
हातही न लावण्याचे दिले आदेश ;
चोरी करण्याला आळा घालून ,
स्वच्छ प्रशासनाचा दिला संदेश.
तलवारीसोबत हातात पट्टी घेऊन
ठेवल्या सा-या जमीनीच्या नोंदी ;
स्वराज्याचा उत्तम प्रशासक बनून,
दूर सारला कारभार अनागोंदी.
रवि ताकसांडे
गडचांदुर जि. चंद्रपूर















