prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – आई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – आई

0
105

मायेचा जिव्हाळा तिचं निरागस व्यक्तीमत्व
अंतरात्माला मारून जपते जगण्याचं सत्व

तु सांग मला आई तुझ्या मनातील गहराई
अशी का गं तु स्तब्ध , जणू मौनच काही

याच कुळातील मी पणती, तो कुळाचा दिवा
त्याच्या दुखात तु गंभीर,मग माझा का हेवा

भरवताना त्याला घास, शितलतेची माया दिली
अपराधी मी जणू अशी निरागस दुर्दैवी वेली

मी डोईवरचे वाटे ओझे, त्याचा विचार सारासार
मी आत्मजा या घरची, मायबाप का व्हावा भार

चालताना माझा सोडून हात, त्याला दिला आधार
वृध्दत्वाच्या वळणावर, सोडून गेला तुला निराधार

शिक्षणासाठी उपाशी राहून, किती भोगली चणचण
आणून उसनवारी पैसा, हट्ट केलेस त्याचे पुर्ण

झिजून झिजून हाडं, आयुष्यभर जिवन कष्टात वाहीलं
वृध्दत्वी आयुष्याचे होणार काय, मनी दुखात साहीलं

कल्पनेपलीकडची ही तुझी संस्मरणीय आत्मकथा
आले या भोगाशी घडली वृध्दत्वाची दुर्दैवी व्यथा

यातनाशी ही अशी झुंज, कंठी दाटला निशब्द त्रान
तरीही अंतिम ईच्छा भेट वारसा झुंजंते अंतर मन

डोळ्यात आणून प्राण अश्रू भेटीसाठी पाणावले
मुखावरचे हावभाव क्षणात कायमचेच थांबले.

नंदा भगत / कारंजा लाड
वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here