prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जानता राजा श्री....

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जानता राजा श्री. छत्रपती शिवाजी महाराज

0
153

जानता राजा श्री.छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्वराज्याचे तोरण बांधले शौर्य, पराक्रमांनी
शिवछत्रपतींच्या चरणी पुष्प अर्पूणी
गाऊया थोरवी त्यांची जयंतीदिनी…..१

जन्मले शिवबाळ माता जिजाऊ पोटी
सनई, चौघडे वाजंत्री वाजती
शिवनेरी किल्ला दुमदुमला जन्मदिनी
रयतेला मिळाले शिवछत्रपती….२

तेजस्वी रूप दिसे शिवरायांचे
सिंहाची छाती, गर्जना ओठी
कणखर बाणा, चपळता अंगी
गणिमी कावा असे शत्रूंसाठी…..३

घोड्यावर असे शिवबांची स्वारी
चढती डोंगर, दरी मावळे घेऊनी
तलवार घेवूनीया हाती गजर करती
हर हर महादेव…जय भवानी….४

स्वराज्य, स्वधर्म आणि स्त्रीयांचा आदर
संदेश देणारे महान आदर्श नेतृत्व
अन्यायाविरुद्ध करून संघर्ष
स्वातंत्र्याची जान करून देणारे कर्तृत्व…..५

जाणता राजा शिवछत्रपतींचे वर्णावे किती गुण
महान योध्दा होते कुशल प्रशासक
भारतीय इतिहासातील महान कर्तृत्ववान राजे
मराठा साम्राज्याचे झाले पहिले संस्थापक…..६

सौ. रंजना धर्मपाल आटे
‌ जिल्हा वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here