prabodhini news logo
Home ठळक बातम्या रिपब्लिकन सेना, आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश!

रिपब्लिकन सेना, आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश!

0
114

अमोल जगताप उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मालेगाव (जि. नाशिक) – बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. मालेगाव येथील जिल्हा संपर्क कार्यालयात आयोजित पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात नाशिक पूर्वचे जिल्हाध्यक्ष दिपक पवार तसेच वंचित बहुजन आघाडी प्रदेश सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवीन सदस्यांचे स्वागत करत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

रिपब्लिकन सेनेचे सुनील आहिरे, सिद्धार्थ उशिरे, आरपीआय आठवले गटाचे दिलीप शेजवळ, संतोष राजाराम आहिरे, शांताराम सोनावणे, विजय बिराडे, हिरालाल निकम, साईनाथ निकम, विनोद लक्ष्मण जगताप, उदय सरदार, मुकेश खैरनार, राजू वाघ, सोमनाथ मोरे आदींनी पक्ष प्रवेश केला.

यावेळी बोलताना जितरत्न पटाईत यांनी सांगितले की, सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने संघर्ष करत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पक्षप्रवेशामुळे संघटनात्मक बळ वाढणार असून नाशिक पूर्व भागात पक्षाची ताकद अधिक मजबूत होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नवप्रवेशित सदस्यांनी पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठा राखून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here