prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपुरातील मातृशक्तीने तोडाला कोल्हापूरचा विक्रम

चंद्रपुरातील मातृशक्तीने तोडाला कोल्हापूरचा विक्रम

0
186

२७०० महिलांनी केले लावणी नृत्य

पहिल्याच प्रयत्नात गिनीज बुक मध्ये नोंद

सलग १० महिने चालला सराव

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क, चंद्रपूर – जगतिक महिला दिन काही दिवसांवर असतांना जिल्ह्यातील १७०० विद्यार्थिनी व १००० महिलांनी सलग १० महिने रोज एकतास सराव करून साडेसात मिनिटांची लावणी सामूहिकरीत्या रविवारी(दि१मार्च) सादर केल्याने या नृत्य अविष्काराची चर्चा सुरू आहे.या अविष्काराची नोंद’गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून चंद्रपुरातील मातृशक्तीने कोल्हापूरचा लावणी नृत्य विक्रम मोडला आहे.२०१७ मध्ये कोल्हापुरात १३३६ महिलांनी लावणी सादर करीत विक्रम नोंदविला तर चंद्रपुरात २७०० पैकी २४३२ मातृशक्तीने अस्सल लावणी नृत्य पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या करून हा विक्रम उत्कृष्ट महिला मंचने आपल्या नावे केला आहे.अशी माहिती जापान येथील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ऑफिशियल ऍडज्युरिकेटर सोनिया युशिरोगाची यांनी चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजित कार्यक्रमात रविवारी दिली.
यावेळी मंचावर हा प्रयोग साकारणाऱ्या उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्ष छबुताई वैरागडे,सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ.पी.एस.आंबटकर,सिडीसीसी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, डॉ. रजनी हजारे, सुषमा शिंदे, संदीप पोशट्टीवार,नगरसेवक राहुल घोटेकर पियुष आंबटकर ब्रिजभूषण पाझारे प्रशांत बोराडे, श्रीकृष्णा वॉच संचालक, सोनी साहेब,देवेंद्रजी बेले, जितू इटनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.छबुताई वैरागडे यांना प्रमाणपत्र देऊन उत्कृष्ट महिला मंचला गौरवान्वित करण्यात आले.

जागतिक स्तरावर झालेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट महिला मंचाच्या अध्यक्षा छबुताई वैरागडे यांच्यावतीने चांदा क्लब ग्राउंड येथे करण्यात आले.हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने चंद्रपुरातील 19 शाळेतील विद्यार्थिनी तसेच महिलांनी या विश्वविक्रमात आपला सहभाग नोंदविला व चंद्रपूरचे नाव जागतिक पटलावर सुवर्ण अक्षरात कोरले गेले.विक्रम झाल्यावर २० मिनिटांची लावणी सादर करण्यात आली.हा प्रयोग बघून दर्शक मंत्रमुग्ध झाले.

आणि प्रयोग झाला यशस्वी

मागील दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मुलींचे लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली गेली. यासाठी पुण्याचे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रत्नाकर शेळके यांनी चंद्रपुरातील शंभर नृत्य निर्देशकांना प्रशिक्षण दिले व नंतर या सर्वांनी शाळांमधील विद्यार्थी तसेच महिलांना प्रशिक्षण देऊन पूर्ण तयारी केल्या गेली.रविवारी प्रारंभी साडेसात मिनिटांची लावणी २७०० महिलांनी सादर केली.यातील २४३२ नृत्यांगणांनी न चुकता लावणी केल्याने विश्व विक्रम झाल्याचे नंतर घोषित करण्यात आले. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने ‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा ‘या नृत्यावर सर्व सर्व थिरकले.
संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जीवनकर, नौशादभाई, प्रा. निलेश बेलखेडे यांनी केले.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी छबु वैरागडे ,साक्षी कार्लेकर,सोनाली धनमने, मेघा अदणकर,प्रीती बल्लावर, सारिका बोराडे,स्नेहा काळे, आरती वर्मा नीरज वर्मा नंदराज जीवनकर सागर अंदणकर, मनीषा भाके ओम वैरागडे, किरण बल्की,माया खंनके पूजा पडोळे,वसुधा बोडखे,अर्चना चहारे, उषा भोयर, वंदना मुंनघाटे, ज्योती एकोनकर, सपना महादिवार, योगिता धनेवार, अभिलाशा मैंदलकर, रश्मी पिटूलवार, मनीषा कन्नमवार, वैशाली कन्नमवार, वंदना राधारपवार मंगला रुद्रपवार,प्रिया खंनके, करीना वांढरे, मृणाल भाके, परेश गौरकर विवेक हादगांवकर वैशाली भागवत,संतोष पगारे,सविता ढुमने रिमा मोगरे, संद्या आतेवार,सुवर्णा बेझलवार जयश्री मंगरूळकर, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here