prabodhini news logo
Home ठळक बातम्या देवळा खामखेडा येथे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान”

देवळा खामखेडा येथे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान”

0
141

देवळा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – देवळा तालुक्यातील खामखेडा येथे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून कार्यक्षमता वाढविणे, स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे,
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
खामखेडा ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ सेवा देणे,
आरोग्य, शिक्षण, उपजीविका व सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविण्यासाठी उमेद अंतर्गत ग्रामीण भागात महिलांचे समूह करून महिला सक्षम करण्याचे काम हे अभियान करत असते . मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आदिवासी वस्तीवर जाऊन महिलांचे समूह स्थापन करून त्यांना बँकेचे व्यवहार कळावे त्या सक्षम व्हाव्या यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली, सदर मोहीम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सुरेखा गांगुर्डे, शोभा सूर्यवंशी अश्विनी बच्चव, सुनंदा चव्हाण, सुषमा राऊत जयश्री बच्चव, आशा वाघ, यांनी विशेष परिश्रम घेतले व त्यांना मार्गदर्शन तालुका अभियान व्यवस्थापक मनोज साळी, प्रभाग समन्वयक वाळके सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here