prabodhini news logo
Home कविता लेख – घात

लेख – घात

0
139

वेळ जात होता,, क्षण जगणं घेऊन यशाची शिखरे स्वप्न
घेऊन येत होते… चालताना समोर अनेक वाटा दिसता
मन व्याकूळ झाले होते….
कुठे तरी कुजबुज सुरु आहे..
कुणाला तरी आपलं यश…
खुपते आहे.मनात डोळ्यात बरंच काही सलते आहे…
शत्रु असता जवळीक मन मात्र बाहेर शोधते… काय कुणास ठाऊक ? आपलेच दात व आपलेच ओठ.. असं च असतं
“घात”…!!!
कधी कधी मनात असंख्य प्रश्न निर्माण होतो.. कशासाठी आपलेच लोक आपलं विश्वास घात करुन चाल खेळली जाते..
काय सिद्ध करायचं असतं.. एखाद्या ला उद्ध्वस्त करण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातो.. एकाच घरात राहुन
काय म्हणायचं याला नक्की??
घात कि विश्वास घात??
समोर जाताना.. एखाद्या चा आयुष्यात का लोक खड्डा निर्माण करतात..व घालून पाडून बोलुन समाजात काय दाखवायचे प्रयत्न करतात.. पैसा व नको ते बोलणं इतकं लोकांना प्रभावित करते..की त्याचं आपल्या माणसांना त्यांची ओळख सुद्धा न व्हावी… काही गोष्टी दिसुन पण न दिसावया ..
खंत वाटते.. अशा घटनांची??
स्वतः पण सुखात जगायचं नाही.दुसराला पण जगु द्यायचे नाही.? हे चांगले लक्षण नाही… वाईट विचारांचे लोक या पातळीवर जाऊन असे काम करायला कसलं ही विचार करतं नाही?? पण ऐक तरी दिवस कोणत्याही परिस्थितीत ते कार्य बाहेर पडतं.. खोटं जास्त वेळ टिकत नाही.. सत्य बाहेर पडतेच… हे पण तितकेच खरे आहे.

सौ.सोनम वाढई
गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here