prabodhini news logo
Home कविता कविता – माझी प्रबोधिनी

कविता – माझी प्रबोधिनी

0
86

जीव ओथुन उभं केलं
छोट्याशा त्या घराला
क्षितिजाचे चांदणे लावले
माझ्या या प्रबोधिनीला।।

माझ्या ममता नि प्रेम
दिल्यात आपण सर्वांनी
सर्व भारताच नाव कमावले
आपल्या आज प्रबोधिनी।।

लाभली मला साथ छान
खूप खूप प्रेम तुम्ही दिले
एका सामान्य मुलींचेच
आयुष्य प्रबोधिनीने घडवले।।

दर आठवड्याला आम्ही
छान छान उपक्रम घेतले
वेळ नसतानाही सरांनी
आपले काव्य प्रसिद्ध केले।।

आज मात्र आहे छान
प्रबोधिनी न्यूजचा सोहळा
सर्व मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी
चंद्रपूरला झाले गोळा।।

माझ्या प्रबोधिनी मंचचे
आज स्वप्नं पूर्ण झाले
मीच मांडलेला डाव तो
आज मीच जिंकून आले।।

राहो अशीच साथ आपली
आज खरंच मन भरून आले
सर्वांचाच शुभ आशीर्वादाने
आज प्रबोधिनीचे स्वप्नं पूर्ण झाले।।

प्रा. समिंदर शिंदे, लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here