prabodhini news logo
Home पुणे लेख – अहंकाराची साडेसाती

लेख – अहंकाराची साडेसाती

0
121

अहंकार म्हणजे काय?
अहंकार म्हणजे “मीच मोठा”, “मीच बरोबर”, “माझ्याशिवाय काहीच नाही” अशी भावना. आत्मविश्वास आणि अहंकार यात सूक्ष्म फरक आहे. आत्मविश्वास उन्नतीकडे नेतो; अहंकार विभाजन, दुखापत आणि एकटेपणाकडे नेतो. माणसे दुरावतो.
अहंकाराची साडेसाती
जेव्हा यश डोक्यात जाते, पाय जमिनीवर राहत नाही, पद, पैसा, ज्ञान किंवा प्रसिद्धीमुळे आपण इतरांना कमी लेखू लागतो. त्याच वेळी ती सुरु होते.
“माझेच मत अंतिम” असे वाटू लागते.हीच सुरुवात असते. मनावर अहंकाराचा शनी बसतो.
याचा परिणाम म्हणजे
नाती तुटू लागतात.टीका सहन होत नाही.चुका मान्य करण्याची ताकद कमी होते.एकटेपणा वाढतो.
अहंकार माणसाला वर नेतो असे भासवतो, पण आतून रिकामेपण वाढवत राहतो.
यातून बाहेर पडण्यासाठी
स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणे,चूक मान्य करणे.
कृतज्ञता बाळगणे.
सेवा, नम्रता यातून इतरांसाठी काही निस्वार्थ कामे करणे.
इतरांचेही मत मनापासून ऐकणे.
जशी शनीची साडेसाती संयम, परिश्रम आणि प्रामाणिकपणाने संपते, तशीच अहंकाराची साडेसातीही नम्रतेने, आदरपूर्वक वागण्याने संपते.
अहंकार म्हणजे डोक्यावरचा मुकुट; दिसायला सुंदर, पण जड आहे. माणूस जीवनातूम मित्रांना, कुटुंबाला गमवू शकतो.
नम्रता म्हणजे काय तर,पायातील चप्पल साधी, पण प्रवास सोपा करणारी आहे. समाजात नाव उंच करणारी आहे.
अहंकाराची साडेसाती टाळायची असेल, तर नम्रतेचा मार्ग स्वीकारावा. सर्वांशी आदराने वागावे.
कारण शेवटी माणसाला मोठे बनवते ते त्याचे पद नाही तर त्याचे मन आणि इतरांशी वागणूक होय.
तर चला मित्रहो!! अहंकाराच्या बळी न पडता नम्रपणा आणि आदर युक्त भाव जपुयात….

वसुधा वैभव नाईक,
पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here