prabodhini news logo
Home चंद्रपूर जीवनातील विविध अनुभूतीना आविष्कृत करा : प्रा.डॉ. राजकुमार मुसणे

जीवनातील विविध अनुभूतीना आविष्कृत करा : प्रा.डॉ. राजकुमार मुसणे

0
118

प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर : मानवी जीवन हे गुंतागुंतीचे आहे. जीवन मार्गक्रमण करताना येणाऱ्या विविध अनुभव, प्रसंग, घटनांना शब्दबद्ध करा, जीवनातील विविध अनुभूतीना प्रामाणिकपणे आविष्कृत करीत साहित्य निर्मिती करा असे प्रतिपादन समीक्षक प्रा. डॉ. राजकुमार मुसणे यांनी केले. ते राज्यस्तरीय प्रबोधिनी स्टार पुरस्कार 2026 या वितरण सोहळ्याप्रसंगी आयोजित कवी संमेलनात बोलत होते.
यावेळी आयोजक मा.प्रशांत रामटेके, नम्रता सरदार (रामटेके), प्रा. डॉ.स्मिता मेहत्रे प्रणोती कळमकर, मा.रंजना आटे, रंजना भैसारे उपस्थित होते. शब्दांना मान, प्रतिभेला ओळख, साहित्याला नवा प्रकाश आणि दिशा मिळावे या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन गुरुमाऊली सभागृहात करण्यात आले होते. पुढे बोलताना डॉ. राजकुमार मुसणे यांनी प्रशांत रामटेके यांच्या प्रयासाने प्रबोधिनी स्टार हा एक उत्कृष्ट मंच आपल्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या मंचचा समुचित उपयोग करून काव्य निर्मितीला विविध धुमारे फुटावेत आणि त्यातून आपल्या सगळ्यांच्या कवितांचे संकलन पुस्तक रूपाने प्रकाशित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.साहित्याचे स्वरूप स्पष्ट करीत काव्य निर्मिती कशी करावी, काव्य निर्मितीचे विशेष कोणते, प्रतिमा, लय, ताल, प्रास, यमक यांचे भान कसे ठेवावे. आपल्या मनातील आशय कसा व्यक्त करावा, या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी कवयित्री रंजना आटे लिखित मनगुंफण या कवितासंग्रहाचे प्रकाशन ही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी वंदना वाटाणे (कामगार), उज्वला नगराळे (रमाई),माधुरी गाऊत्रे (प्रेम), शालिनी चांदेकर (बाबा), तुळजाबाई खडसे (होळी), सविता भोयर (माय मराठी), अभय डी. रंगारी (जय जय जिजाऊ भूमी), उषा ढोके-भुरे (उडवूया रंग फुलाचा), कपिल मेश्राम (बदनाम), अनिल भुरे (पट नोंदणी),छाया टिपले (माता महाकाली) सरिता गव्हारे (आई), राजीव मुसणे (जिवलगे), अर्चना ठाकरे (घे उंच भरारी), निलिमा मोहमारे (माझ्या अंत मनातील कविता) अनुराधा मारचट्टीवार (मराठी शाळा शिकाला हवी.,अशाप्रकारे विविध कवींनी आपल्या कविता प्रभावीपणे सादर करून रसिकांना अंतर्मुख केले. अनिल भूरे यानी प्रभावी गायनाने सादर केलेली कविता रसिकाना प्रचंड आवडली. कार्यक्रमाचे बहारदार संचालन डॉ. प्रा. पद्मिनी घोसेकर यांनी प्रास्ताविक प्रशांत रामटेके यांनी तर उपस्थितांचे आभार नम्रता रामटेके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here