prabodhini news logo
Home कुरखेडा लेख – स्त्री म्हणजे सहनशिलता की सामर्थ्य

लेख – स्त्री म्हणजे सहनशिलता की सामर्थ्य

0
125

स्त्री जिच्या उदरातून नवं आयुष्य जन्माला येतं ती फक्त जन्म देत नाही, तर त्या आयुष्याला माया,संस्कार आणि प्रेमाची उबही देते.तिच्या कुशीतूनच माणसाला जगण्याचा पहिला श्वास मिळतो. आणि तिच्या मायेच्या सावलीतच आयुष्याला खरा आकार मिळतो. स्त्री एक अशी ज्योत आहे. जी स्वतः जळत असते, पण आपल्या प्रकाशाने इतरांच्या आयुष्याला नवी दिशा दाखवते. स्त्री म्हणजे नुसते एक व्यक्ती महत्त्व नाही, तर ती एक भावना आहे. तिच्या डोळ्यात सदैव माया असते. मनाने ती समुद्रासारखी खोल असते. ज्यात तिने अनेक दुःख, वेदना साठवले असतात. आयुष्यातील प्रत्येक वादळ सहन करण्याची ताकद तिच्यात असते. म्हणूनच मग मनात प्रश्न निर्माण होतो, स्त्री म्हणजे सहनशीलता की, सामर्थ्य?
लहानपणी ती मुलगी असते. जी अनेक स्वप्नांनी भरली निरागस पण हळूहळू आयुष्य तिला जबाबदाऱ्या शिकवते. ती आई होते बहीण होते पत्नी होते आणि प्रत्येक नात्यात स्वतःला विसरून इतरांसाठी जगायला शिकते. अनेक वेळी तिच्या मनात वेदना असतात. डोळ्यात अश्रू असतात.पण ती ते शांतपणे लपवते. कारण तिच्या एका अश्रूने घरातील अनेकांचे मन तुटू शकतात. याची तिला जाणीव असते .
स्त्रीची सहनशीलता ही तिची कमजोरी नाही. उलट हेच तिचे सामर्थ्य आहे. ती वेदना सहन करते. कारण तिला प्रेम जपायचे असते. ती शांत राहते कारण तिला नाती टिकवायचे असतात. पण जेव्हा तिच्या अस्तित्वावर प्रश्न येतो, तेव्हा पर्वताप्रमाणे खंबीर उभी राहण्याची ताकद ती स्वतःमध्ये ठेवते.आईच्या रूपात ती रात्रभर जागून आपल्या लेकरासाठी प्रार्थना करते. मुलगी म्हणून ती घरात आनंद आणते. पत्नी म्हणून ती घराला घरपण देते. आणि जेव्हा वेळ येते,तेव्हा तीच स्त्री असल्याचा कुटुंबासाठी जगाशी लढण्याची ताकद दाखवते.
स्त्रियांच्या डोळ्यातील अश्रू तिच्यातील कमकुवतपणाचे चिन्ह नाही, तर तिच्या मनातील अपार प्रेमाचे प्रतीक आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्त्री फक्त घरापुरता मर्यादित नाही तर प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत आहे या समाजाला ” पूर्ण करणारी व्यक्ती स्त्री आहे. स्त्री ही समाजाला प्रगतीच्या मार्गावर वाढवणारी शक्ती आहे. जिचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे.
म्हणूनच मला वाटतं स्त्री म्हणजे सहनशीलता आणि सामर्थ्याचे सुंदर संगम आहे. एक अशी शक्ती जी आपल्या प्रेमाने जग घडवते आणि निडर होऊन संकटांचा सामना करते. व त्यात विजय सुद्धा मिळवते.
सर्वाना जागतिक महिला दिना हार्दिक शुभेच्छा

विधी ज्योत्स्ना भास्कर बनसोड
मु.ता.कुरखेडा, जि.गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here