
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड चा एक घटक, यांनी सन 2025–26 च्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले विद्यालय, जुनोना येथे 20 (वीस) डेस्क-बेंच (3 आसनी) संच प्रदान केले. या उपक्रमाचा उद्देश शैक्षणिक पायाभूत सुविधा सुधारून विद्यार्थ्यांना उत्तम बसण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचेही वितरण करण्यात आले.
वाय. एल. रावत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन SAIL–CFP चे कार्यकारी संचालक पी. मुरुगेशन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डी. व्ही. रवी चंदर (महाव्यवस्थापक – देखभाल व CSR एपेक्स समिती अध्यक्ष), एल. प्रविण कुमार (महाव्यवस्थापक प्रभारी – मानव संसाधन), उमेश एम. उके (उपमहाव्यवस्थापक – मानव संसाधन), अजय कुमार येलुक्कापाली (सहायक महाव्यवस्थापक – ED सचिवालय), शकील अहमद खान (कनिष्ठ व्यवस्थापक – मानव संसाधन), श्रीकांत चवरे (अध्यक्ष, सर्वसेना शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर) आणि मरोटी एस. विधाते (मुख्याध्यापक, सावित्रीबाई फुले विद्यालय, जुनोना) उपस्थित होते.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक गोंडी नृत्य सादर केले.
इयत्ता आठवीतील तेजू भोयार, इयत्ता नववीतील कृष्ण यादव आणि आदर्श बंबोडे तसेच इतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले व त्याचा विद्यार्थ्यांवर व समाजावर होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला.
NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत यश संपादन करणाऱ्या कु. ओवी आलम यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पी. मुरुगेशन यांनी शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली.
श्री रमेश केदार यांनी आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम SAIL–CFP च्या 2025–26 च्या CSR उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला असून शिक्षण व समाज विकासासाठी संस्थेची बांधिलकी पुन्हा अधोरेखित करण्यात आली.















