prabodhini news logo
Home ठळक बातम्या महिला अधिकार सामाजिक संघटनेची कार्यकारिणी गठीत

महिला अधिकार सामाजिक संघटनेची कार्यकारिणी गठीत

0
131

लाखांदूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – लाखांदूर महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि बौद्धिक विकासासाठी तसेच अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी संरक्षण व जागरूकत्ता निर्माण करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

या संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून त्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते त्यामुळे या संघटनेचा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. त्याचाग एक भाग म्हणून ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून विदर्भ आणि जिल्हा स्तरावर कार्य करण्यासाठी कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

यावेळी विदर्भ कार्याध्यक्ष म्हणून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व ग्रामपंचायत सोनी येथील सदस्य,बुद्धिष्ट समाज संघर्ष समिती लाखांदूर चे सदस्य, निरूताई भारत मेश्राम यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विदर्भ कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच ज्योती रामटेके यांची पूर्व विदर्भ कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अर्पना जांगडे यांची भंडारा जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे व बिंदू रामटेके यांची भंडारा जिल्हा महासचिव (ग्रामीण) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे विदर्भात आणि भंडारा जिल्ह्यात संघटनेचे विस्तार मोठ्या प्रमाणात होऊन महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकी निर्माण होत आहे.
या निवडीबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे राज्यभरातून कौतुक होत असून पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडीचे श्रेय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदांनंद धारगावे आणि संघटनेचे उपाध्यक्ष नम्रता बागडे यांना दिले आहेत.

यावेळी शितल गेडाम, सारिका नागदेवे , मंजुशा चव्हाण , वैशाली वालदे, स्मिता मरघडे, जयश्री बोरकर, वैशाली रामटेके, वनिता बांडेबुचे , छाया कापगते यांच्यासह बहुसंख्य महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here