
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – नागपूर:अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर (सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीची संघटना) आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस, (आंतरराष्ट्रीय संस्था) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘स्त्री शक्ती जागृती मेळावा’ आणि ‘हिरकणी पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात येत आहे.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना मानाचा ‘हिरकणी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. समाजातील स्त्री शक्तीला व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना आत्मनिर्भर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
स्त्री – शक्ती जागृत मेळावा: महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बदलांवर मान्यवरांचे मार्गदर्शन.
हिरकणी पुरस्कार वितरण: शिक्षण, वैद्यकीय , न्याय, समाजसेवा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव.
सांस्कृतिक कार्यक्रम: सामाजिक संदेश देणारे विविध कलाविष्कार.
हा शानदार सोहळा दिनांक १५ मार्च २०२६ रविवार रोजी आदर्श मंगल कार्यालय, जुना सुभेदार लेआऊट, शारदा चौक येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला नागपुरातील नामवंत साहित्यिक, समाजसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित रहावे.असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा डॉ.स्मिता निशिकांत मेहेत्रे यांनी केले आहे.















