
सर्व जातीची जातनिहाय जनगणना करणेबाबत
मागण्या मान्य न झाल्यास 23 मार्च रॅली प्रदशन, 23 एप्रिल ला भारत बंद चे आवाहन
भंडारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग ,ओबीसी मोर्चा च्या संयुक्त विद्यमाने भारतातील 36 राज्यातील 650 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध प्रकारच्या मागण्या च्या संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले, सर्व जातीची जातीआधरित
जनगणना करून “”जिसकी जितनी संख्या भारी,उसकी उतनी भागीदारी””या न्यायाने प्रतिनिधीत्व देण्यात यावे, UGC बिल लागू करावे, TET परीक्षा रद्द करावी नाहीतर TET च्या धर्तीवर राजकीय लोकांना RET राजनीती एलिजीबल टेस्ट लागू करावी, महागाई कमी करावी, जल जगलं जमीनी चे सरक्षण करावे, गुलाम बनविणाऱ्या ईव्हीएम मशीन ला बंद करून बैलेट पेपर वर चुनाव प्रक्रिया सुरू करावी ,स्मार्ट मीटर बंद करून साधे मीटर लावावे, , मूलनिवासी लोकांची सत्ता आणि व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी चार चरणात राष्ट्रव्यापी जनआंदोलन घोषित करण्यात आले होते, त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी रविदास लोखंडे, सुभाष भिवगडे, विजयकांत बडगे, कपिल रंगारी, युवा नेते मुकुल सूर्यवंशी, किशोर सतीमेश्राम,स्मार्ट मीटर ने अन्याय्य ग्रस्त विशांत शामकुवर व शुभम गजभिये , देशबंधु सर , शरयूताई डहाट ,राऊत मॅडम, आणि इलेक्ट्रिक मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले अभय डी रंगारी उपस्थित होते, मागण्या मान्य न झाल्यास 23 एप्रिल ला भारत बंद चे आवाहनही करण्यात आले..















